तिहार जेल मध्ये सुशीलकुमारचे कुस्ती क्लासेस

नवी दिल्ली प्रतिनिधी

7 ऑॅगस्ट

सागर धनखड याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी ठरलेला ऑॅलिम्पियन पहिलवान सुशील कुमार सध्या दिल्लीच्या तिहार जेल मध्ये जेल कर्मचार्‍यांना रेसलिंगच्या आणि फिटनेसच्या टिप्स देत असल्याचे समजते. जेल मध्ये प्रथम जादा प्रोटीन डायट आणि नंतर सेल मध्ये टीव्हीची मागणी करून सुशील कुमार चर्चेत आला होताच तो आता या नव्या भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेल मध्ये काम करणारा आणि चांगली बॉडी असावी अशी इच्छा असणारा स्टाफ सुशील कुमार कडून डायट आणि व्यायामाचे सल्ले घेत आहेत. त्यासाठी जेल नंबर दोन मध्ये सकाळ संध्याकाळ बॉडी बिल्डिंगची शाळा सुरु झाली आहे. सुशीलकुमार त्याच्या सेल मधून बाहेर येऊन त्या संदर्भात टिप्स देतो. त्याचा ऑॅलिम्पिक प्रवास जाणून घेणे यातही जेल कर्मचारी गुंग आहेत. विशेषत: जेलचे वॉर्डन शिपाई यात सामील होत आहेत.

जेलचे मुख्य वॉर्डन आणि अन्य अधिकारी सुद्धा सुशीलचे किस्से ऐकणे, टिप्स घेण्यासाठी उत्सुक आहेत. या उपक्रमात कैद्यांना सामील करण्यात आलेले नाही. कारण त्यामुळे तुरुंगातील वातावरण खराब होण्याची भीती आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन या शिकवण्या सुरु आहेत असे समजते. सुशीलकुमार जेव्हा त्याच्या सेल मध्ये किंवा बाहेर व्यायाम करतो तेव्हाही जेल स्टाफ त्याची पाहणी करतात असेही समजते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!