भारतीय पुरुष हॉकी टीम विजयात कोच जोडप्याचे मोठे योगदान
मुंबई प्रतिनिधी
6 ऑगस्ट
टोक्यो ऑॅलिम्पिक मध्ये तब्बल 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी टीमने कांस्य पदक जिंकून इतिहास घडविला आहेच पण टीमच्या या विजयात ऑॅस्ट्रेलियन कोच गहम रीड आणि त्यांच्या पत्नी जुलिया यांचेही मोठे योगदान आहे. रीड यांची प्रशिक्षक म्हणून निवड केल्याने भारताला टू इन वन कोच मिळाले असे म्हटले तरी ते गैर ठरू नये.
गहम खेळाडूंचा खेळ निर्दोष व्हावा याची जबाबदारी कसोशीने पार पाडत होते तेव्हाच त्यांची पत्नी जुलिया पदक जिंकल्यावर भारतीय खेळाडूंना इंग-जी मधून भाषण करणे सहज व्हावे यासाठी या खेळाडूंना इंग-जी शिकवीत होत्या. हिंडण्या फिरण्याची हौस असलेल्या या जोडप्याचा भारतात दीर्घ मुक्काम आहे. भारतात राहूनच इतिहास घडवायचा यासाठी ग-ॅहम खेळाडूंना खेळातील खाचाखोचा शिकवीत होते आणि जुलिया त्यांना इंग-जी शिकवीत होत्या.
जुलिया सांगतात, बर्याच खेळाडूंना इंग-जी येते पण बोलताना थोडी धाकधूक असते. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा मी प्रयत्न केला. शिकवणीचे हे दिवस खूप आनंदाचे होते. विजयी स्पीच देण्याची तयारी मी अनेक वर्षे करून घेत होते आणि आज ते स्वप्न साकार झाले. जुलिया खेळाडूंना, तुम्ही पदक जिंकले आहे, आणि आता आपले मनोगत व्यक्त करत आहात असे समजूनच इंग-जी बोला असे शिकवीत होत्या. त्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढण्यास मदत झाली असे टीम सदस्य सांगतात.
ग-ॅहम आणि जुलिया यांनी या काळात हिंदी शिकण्याचा प्रयत्न केलाच पण खेळाडूंबरोबरचे वैयक्तिक नाते अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. ग-ॅहम भारतीय पदार्थांच्या प्रेमात पडले असून रोज सांबार खाण्यास आनंदाने तयार आहेत. त्यांना दाल भात आवडतोच पण वडापाव ही त्याचा आवडता पदार्थ बनला आहे.