न्यूझीलँडचा संघ 18 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करणार – पीसीबी
लाहौर प्रतिनिधी
5ऑगस्ट
न्यूझीलँडचा क्रिकेट संघ 18 वर्षानंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार असून या दौर्यात संघ तीन एकदिवशीय व पाच टि-20 सामन्यांची मालिका खेळणार असल्याची घोषणा पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ने गुरुवारी केली. न्यूझीलँडने या आधी नोव्हेंबर 2003 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.
न्यूझीलेँडचा संघ पाकिस्तानच्या दौर्यात रावळपिंडीतील पिंडी क्रिकेट मैदानावर 17,19 व 21 सप्टेंबरला तीन एकदिवशीय सामन्यांची मालिका तर लाहौरच्या गद्दाफी मैदानावर 25 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोंबर पर्यंत पाच टि-20 सामन्यांची मालिका खेळेल. विश्व कसोटी चॅम्पियन संघ असलेला न्यूझीलँड संघ पुढील वर्षी कसोटी मालिका खेळण्यासाठी परत एकदा पाकिस्तानचा दौरा करेल.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले की न्यूझीलँड सारखा शीर्षस्तरीय संंघाच्या विरुध्द लाल आणि पांढर्या चेंडूची मालिका खूप रोमांचक होणार आहे. 2019 विश्व कपच्या अंतिममध्ये आणि जो विश्व कसोटी चॅम्पियन आहे व टि-20 क्रमवारीतेमध्ये तिसर्या क्रमांकाचा संघ आहे त्यांच्या येण्याने स्थानिय प्रशवंसक जबरदस्तपणे आकर्षीत होतील आणि पाकिस्तानला एक सुरक्षीत असल्याचीही ओळख मिळेल.
खानने पुढे सांगितले की मला आनंद आहे की न्यूझीलँड क्रिकटने दोन अतिरीक्त टि-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या आमच्या प्रस्तावाला स्वीकार केले आहे. हे फक्त दोनीही देशाना आयसीसी पुरुष टि-20 विश्व कपच्या तयारीसाठी मदत करण्या बरोबरच पाकिस्तानमध्ये अतिरीक्त कालावधीत राहण्याची संधीही देईल आणि आमच्या संस्कृतिला जवळून जाणून घेण्याची त्यांना संधी मिळेल.