ऑॅलिंपिक रौप्यपदक विजेता रविकुमार दहियाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई प्रतिनिधी
5 ऑगस्ट
टोकियो ऑॅलिंपिकमध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात फ्रि स्टाईल कुस्तीचं रौप्यपदक जिंकणार्या कुस्तीपटू रविकुमार दहियाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑॅलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, ऑॅलिंपिकच्या सर्वच सामन्यांमध्ये रविकुमारनं चमकदार कामगिरी केली. दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. अंतिम फेरीत सुवर्णपदक हुकलं असलं तरी त्यानं जिंकलेल्या रौप्यपदकालाही सुवर्णझळाली आहे. देशाला पहिलं वैयक्तिक ऑॅलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधवांनी 1952च्या हेलसिंकी ऑॅलिंपिकमध्ये जिंकून दिलं होतं. तिथून सुरु झालेला देशाच्या वैयक्तिक ऑॅलिंपिक पदकांचा प्रवास आज रविकुमार दहियापर्यंत येऊन पोहोचला आहे. देशाच्या ऑॅलिंपिक पदकांचा प्रवास इथंच थांबणार नाही, यापुढे तो अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी रविकुमार दहिया आणि अन्य खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.