कुस्तीमध्ये भारताला मोठा धक्का, गोल्ड मेडलची दावेदार पराभूत
टोकोयो
5 ऑॅगस्ट
टोकयो ऑॅलिम्पिकमध्ये भारताला महिला कुस्तीमध्ये मोठा धक्का बसला. भारताची नंबर 1 कुस्तीपटू आणि गोल्ड मेडलची दावेदार विनेश फोगाटचा पराभव झाला आहे. महिलांच्या 53 किलो वजनी गटात विनेशनं गुरुवारी सकाळी पहिली मॅच जिंकत सुरुवात तरी जोरदार केली होती. मात्र त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये ती पराभूत झाली.
बेलारुसच्या वेनेसा कालजिंसकायानं विनेशचा 9-3 नं पराभव केला. या पराभवानंतरही विनेशीची मेडलची आशा कायम आहे. त्यासाठी वेनेसाला फायनलमध्ये जावं लागेल. त्यानंतर रेपजेज राऊंडच्या माध्यमातून विनेशला ब्रॉंझ मेडल जिंकण्याची संधी असेल. विनेशनं यापूर्वी स्वीडनच्या सोफिया मॅटीसनचा 7-1 नं पराभव केला होता.
पुरुषांच्या कुस्तीमध्ये गुरुवारी भारताला गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे. 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीयानं फायनलमध्ये धडक मारली आहे. रवीनं सेमी फायनलमध्ये कझाकस्तानच्या कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवाचा पराभव केला. भारताकडून कुस्तीमध्ये यापूर्वी सुशील कुमारनं लंडन ऑॅलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या मल्लानं ऑॅलिम्पिकमध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. आता ही फायनल जिंकत गोल्ड मेडल जिंकण्याची ऐतिहासिक संधी रवी कुमारकडं आहे.