टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनची कांस्यपदकाला गवसणी
नवी दिल्ली प्रतिनिधी
4 ऑगस्ट
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी लव्हलिना बोर्गोहेनचे केले अभिनंदन क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, लव्हलिनाचे अभिनंदन करताना म्हणाले ,भारताला तुमचा अभिमान आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मुष्टियोद्धा लव्हलिना बोर्गोहेनने 69 किलोग्रॅम गटात कांस्यपदक पटकावले आहे. आज उपांत्य फेरीत विश्वविजेत्या तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीकडून तिला पराभव पत्करावा लागला. यापूर्वी पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे तर मीराबाई चानूने भारोत्तोलनात रौप्य पदकाची कमाई केली आहे. राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपर्यातील भारतीयांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लव्हलिना बोर्गोहेनचे अभिनंदन केले आहे.