ऑलिम्पिक महिला हॉकी : अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल

टोकियो

3ऑगस्ट

भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपात्य सामन्यात पोहचुन इतिहास रचला असून आता त्यांचा उपात्य सामन्यात बुधवारी अर्जेटिनाशी सामना होणार आहे. याच बरोबर संघाची नजर अंतिम सामन्यात पोहचण्यावर असेल.

भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धतील उपात्यपूर्व सामन्यात जागतीक क्रमावरीतेत दुसर्‍या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत केल्याने संघाचे मनोबल अधिकच वाढले आहे. संघाने ऑस्ट्रेलिया विरुध्द अपेक्षापेक्षा अधिक प्रदर्शन केले आहे आणि त्यांच्याकडे गमविण्या सारखे काहीही नाही. तसेच शीर्ष संघाच्या विरुध्द खेळल्याने त्यांना अनुभव प्राप्त झाला आहे. मात्र ते ऑलिम्पिकच्या अंतिममध्ये प्रवेश करण्यासाठी या संधीला गमवू इच्छित नाहीत.

ऑलिम्पिक सुरु होण्याच्या आधी जागतीक क्रमवारीतेमध्ये नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत करुन नवीन मानक निश्चित केले आहे.

भारतीय संरक्षक आणि गोलरक्षक सविता पुनियाने ऑस्ट्रेलिया विरुध्द उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते आणि तिच्यावर अर्जेटीना विरुध्दही या प्रदर्शनाची पुर्नवृत्ती करण्याची जबाबदारी असेल. मात्र अर्जेटिनाचा संघ ऑस्ट्रेलियापेक्षा खूप वेगळा आहे आणि तो खूप फिट संघ आहे.

अर्जेटिनाकडे अगुसटीना गोरजेलानीच्या रुपात शॉट कॉर्नर विशेषतज्ञ उपस्थित आहे तर फॉरवर्ड अगुसटीना अल्बर्टारिओने दोन मैदानी गोल केले आहेत.

भारतीय संघाला अर्जेटिना संघाची  काही प्रमाणात कल्पना आहे. भारताने या वर्षाच्या जानेवारीत अर्जेटिना विरुध्द काही सामने खेळले होते मात्र ते सर्व मैत्री सामने होते आणि खेळाडू तेथे ऑलिम्पिकच्या रुपात गंभीर नव्हते.

कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाखालील महिला संघाला गट साखळी सामन्यात विश्व क्रमांक एकचा संघ नेदरलँड विरुध्द 1-5 ने, जर्मनी विरुध्द 0-2 ने आणि ग-ेट बि-टेन विरुध्द 1-4 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतीय संघाने आयरलँड विरुध्द 1-0 ने आणि दक्षिण अफ्रिके विरुध्द 4-3 ने विजय मिळवून आपल्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. तर ग-ेट बि-टेनने आयरलँडला हरविल्याने भारतीय संघ उपात्यपूर्व सामन्यात पोहचू शकला.

अर्जेटिना विरुध्द भारतीय संघाला अधिक आक्रमक होणे आणि संधी निर्माण करण्या बरोबरच चांगल्या पध्दतीने डिफेंड करण्याची गरज आहे. संघाला मुक्तपणे खेळण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!