काश्मीर प्रीमियर लीगला परवानगी देऊ नका, बीसीसीआयचे आयसीसीला पत्र
मुंबई प्रतिनिधी
3 ऑगस्ट
काश्मीर प्रीमियर लीगच्या मुद्यावरुन वातावरण तापलं आहे. बीसीसीआयने या मुद्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता यात बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहित या लीगला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी केली आहे.
पाकिस्तानच्या या स्थानिक टी-20 स्पर्धेला 6 ऑॅगस्टपासून सुरूवात होत आहे. याआधी बीसीसीआयने या स्पर्धेला परवानगी मिळू नये, यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने केपीएलचे आयोजन काश्मीरमध्ये करण्यात येऊ नये, यासाठी पत्र लिहलं आहे.
दरम्यान, याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या अंतर्गत विषयात बीसीसाआयने दखल दिल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सांगण्यात आले होती की, या स्पर्धेत सहभागी होण्यापासून बीसीसीआय काही विदेशी खेळाडूंना रोखत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्षल गिब्ज या स्पर्धेत भाग घेण्याची आशा आहे. त्याने टिवट करत सांगितलं होतं की, केपीएलमध्ये खेळण्यावरून त्याला धमकी देण्यात आली.