सोलापुरात ट्रक व शालेय कारचा भीषण अपघात, 2 चिमुकल्यांसह कार चालकाचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
सोलापूर प्रतिनिधी
3 ऑगस्ट
मालवाहू ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कार चालकासह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सांगली – सोलापूर या महामार्गावर करांडेवाडी फाटा उड्डाणपुलाजवळ घडली. दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (42 रा.उदनवाडी ता.सांगोला), कावेरी मनोज हरीजन( 7 रा.निरलगी ता. ताळेकोटी जि.विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (8 रा. कोंडगोडी ता. जेवरगी जि. गुलबर्गा) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेत आणखी नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदनवाडी येथील चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे याने उदनवाडी येथून 3 पुरुष, 3 महिला, 6 लहान मुले असे 11 लोकांना ओमनी कारमध्ये घेवून कर्नाटक येथील सिंदगी निघाले होते. यावेळी सांगोला तालुक्यातील करांडेवाडी फाट्याजवळ मालवाहू ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (42 रा.उदनवाडी ता.सांगोला), कावेरी मनोज हरीजन( 7 रा.निरलगी ता. ताळेकोटी जि. विजापूर) व गुड्डी चंद्रकांत मगिरी (8 रा.कोंडगोडी ता.जेवरगी जि.गुलबर्गा) या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मालवाहक ट्रक व ओमनी कार यांचा अपघात इतका भयानक होता की, कार पूर्णपणे चक्काचूर सुरू झाली आहे. ओमानी चालक दाजीराम शिंगाडे याचा पाय गुडघ्यापासून खाली तुटल्याने जागीच ते ठार झाले. तर कारमधील कावेरी हरिजन हिच्या डोक्याला पाठीमागील बाजूस व तोंडावर गंभीर मार लागला होता. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता ग-ामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला. याबाबत माणिक लक्ष्मण शिंगाडे यांनी मालट्रक चालकाविरुध्द तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.