मल्हार पुलासाठी पर्यायी मार्ग उभारण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

अतिवृष्टीने नुकसान झालेले साकव, पुल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करवी

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

दि. 26 – मल्हारपूल कोसळल्यामुळे 5 हून जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचे स्टक्चरल ऑडिट करावे, पर्यायी साकव उभारावा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी येथील मल्हार पुलाची पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज पहाणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. मल्हार पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्याचीही त्यांनी यावेळी पहाणी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन.म्हेत्रे, तहसिलदार आर.के.पवार, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता के.के. प्रभू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्वच साकव, पूल आणि रस्ते यांची यादी तयार करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे, त्या त्या ठिकाणी स्टक्चरल ऑडिट करण्यात यावे. ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग नाही, त्या ठिकाणी प्राथमिकतेने साकवांची दुरुस्ती करण्यात यावी. साकव वाहून गेलेल्या ठिकाणी ते उभारण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. संपर्क तुटलेल्या गावांचीही यादी तयार करून नैसर्गिक आपत्तीमध्ये या गावांचा संपर्क तुटणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!