भोरखेडा पटेल विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा….
त-हाडी प्रतिनिधी – ( ज्ञानेश्वरसैंदाणे )
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला प्राचार्य आर एफ शिररसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,एम सी सी व एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्ध्वजाला मानवंदना देत सुंदर संचलन केले यावेळी भोरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच दिपक गुलचंद भिल,उपसरपंच प्रशांत शिवाजी जमादार ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथसिंग भिलेसिंग जमादार,ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी, पर्यवेक्षक पी व्ही पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, गावातील नागरिक उपस्थित होते.या नंतर विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यात विविध दिनविशेष निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व,सुंदर हस्ताक्षर,नृत्य,वेशभूषा, सामान्य ज्ञान, रांगोळी, क्रीडा,व इतर स्पर्धेतील यश प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली अशी चारशे बक्षिसांचे वाटप करण्यात आले सूत्रसंचालन एस आर देसले, किरण कोळी,एस एन पाटील, दिपाली निकम यांनी केले व्ही एस इशी,एन डी चव्हाण, जे डी पाटील ,मिना पटेल ,एस एम पाटील, पी टी चौधरी, व्ही डी पाटील, सुनिल पाटील, आर डी राजपूत, व्ही बी शर्मा ,तुषार पाटील आफ्रिद पटेल, एन एस एस एकक चे कार्यक्रम अधिकारी एन वाय बोरसे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.