ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीची बससेवा सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे आगारप्रमुख यांना निवेदन.
शिरपुर –
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शिरपुर आगारप्रमुख वर्षा मॅडम यांना शिरपुर तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शाळा व महाविद्यालये हे कोरोना काळानंतर आता सुरू होत आहेत व त्यामुळे ग्रामीण भागातुन येणार्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी आपण विद्यार्थ्यांची अडचण समजुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीची बससेवा नियमित पणे सुरू करावी ही विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.या आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदन देते वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील शहराध्यक्ष भूपेश पाटील व कुलदीप जाधव हे उपस्थित होते.