बहुजन समाज पार्टीच्या ठाणे जिल्हा सचिव पदी सिध्दार्थ साळवे यांची निवड
शहापूर प्रतिनिधी
दिनांक १३ जुन रोजी शहापूर विधानसभा नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. शहापूर तालुक्यात सर्वांना परिचित, परखड विचार व अभ्यासु व्यक्तीमत्व असणारे, सर्वांना सहकार्य करणारे, सदैव पक्षाच्या कार्यासाठी तत्पर असणारे तसेच आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते असुन सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन काम करीत असणारे शहापूर विधानसभा माजी महासचिव सिध्दार्थ साळवे यांची ठाणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी सिध्दार्थ साळवे यांनी जाहीर आभार मानुन बहुजन समाज पार्टीला अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी तसेच पक्षाच्या प्रसार व प्रचारासाठी, मजबूत बळकटीकरणासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन असा विश्वास व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात शहापूर विधानसभेतील आजी-माजी कार्यकर्ते, हितचिंतक, बी.व्ही.एफ., बामसेफ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ॲड. महेंद्र जाधव यांनी पक्षप्रवेश केला. तसेच ठाणे जिल्हा संयोजक पदी रामदास भोईर यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव यांच्या हस्ते करण्यात आली.
शहापूर विधानसभा नवनिर्वाचित कार्यकारिणी लक्ष्मण उबाळे (प्रभारी), गुरुनाथ लोखंडे (अध्यक्ष), अॅड. महेंद्र जाधव (महासचिव), परशुराम इंगळे (सचिव), प्रकाश शामकुवर (उपाध्यक्ष), लक्ष्मण घनघाव (सचिव), रविंद्र पवार (बी.व्ही.एफ), आनंद गायकवाड