ओप्पोच्या वापरकर्त्यांना खूशखबर ’या’ तारखांना मॉडेलवर मिळणार अपडेट

नवी दिल्ली प्रतिनिधी

15 जून

जर तुम्ही ओप्पो स्मार्टफोनच्या नव्या अपडेट मॉडेलची वाट पाहत असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. स्मार्टफोन ब्राँड ओप्पोने अँड्राईड 11 ऑॅपरेटिंग सिस्टिमवर आधारित वेगवान काम करणारा कलर ओएस 11 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ओप्पो ए53 हे 17 जूनला आणि ओप्पो एफ 17 तर 26 जूनला अपडेट होणार आहे. तर ओप्पो ए54 हा 16 जूनला आणि ओप्पो रेनो हा 29 जूनला अपडेट होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओप्पोच्या रेनो, एफ आणि ए श्रेणीमधील स्मार्टफोनचे अपडेट दिले जाणार आहे. त्यामधून कस्टमाईज्ड युझर इंटरफेस आणि फ्लेक्सड्रॉप, थ्री फिंगर ट्रान्सलेट यांच्या अपडेटचा समावेश आहे.

ओप्पोचे जगभरात 37 कोटी वापरकर्ते आहेत. कलरओएस हे जगभरातील 80 हून अधिक भाषांना सपोर्ट करते. ए5 2020 आणि ए9 2020 3 जीबी हे अपग-ेड होणार नाहीत. कारण त्यामध्ये कमी रॅम स्टोरेज आहे.

नुकतेच कंपनीने एफ 19 प्रो प्लस डिव्हाईस हे 5 जी स्मार्टफोन विक्रीत आघाडीवर ठरल्याचे म्हटले होते. या स्मार्टफोनची किंमत 25 हजार ते 30 हजार रुपये आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये 5 जी स्मार्टफोनच्या विक्रीत एफ 19 प्रो प्लस हा स्मार्टफोन आघाडीवर असल्याचे काउंटरपाँईट रिसर्चने म्हटले आहे. ओप्पोच्या स्मार्टफोनची अहमदाबाद, बंगळुरू आणि मुंबईमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. एफ 19 प्लस प्रोने तीन दिवसांमध्ये विक्रीतून 230 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!