शिवसेनेच्या निवेदना नंतर महावितरण तर्फे विजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही स्थगित
सावदा (प्रतिनिधी) –
महावितरण तर्फे दिवाळीचे तोंडावर अतिवृष्टि मुळे शेतकरी संकटात असताना त्यांची विज कनेक्शन कट करण्याची मोहीम हाती घेत शेतकऱ्यांन समोर नवे संकट उभे केले होते, याबाबतित आ. चंद्रकांत पाटील यांना माहिती होताच त्यांचे मार्गदर्शना नुसार सावदा येथील शिवसेने तर्फे दी 28 रोजी एक निवेदन सावदा विजवितरण कार्यलयात देण्यात आले व सदर सुलतानी विज वसूली न थांबवील्यास शिवसेने तर्फे सावदा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड़, तसेच अधीक्षक अभियंता जळगाव यांचे कार्यालया समोर दी 29 रोजी एकाच वेळेस आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला होता, दरम्यान यानिवेदनाची तात्काळ दखल घेत महावितरण ने सदर विज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही वरिष्ठ कार्यालयाचे आदेशा नुसार थांबवीण्यात आल्याचे पत्र आ. चंद्रकांत पाटील यांना महावितरण ने दिले असून यावेळीपत्र स्वीकारतांना शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद पाटील, गौरव भैरवा, मनीष भंगाळे, आदी शिवसैनिक उपस्थित होते याअनुषंगाने शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्या मुळे शेतकऱ्यांना दीवाळी चे तोंडावर दिलासा मिळाला असल्याने दी 29 रोजी होणार आंदोलन देखील स्थगित करण्यात आले आहे व यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.