शेतीचे वीज बिल माफ करा अन्यथा आंदोलन करू – शेतकऱ्यांचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन.
सावदा (प्रतिनिधी) –
अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीजबिल वसुलीसाठी वीज वितरण कर्मचारी घरोघरी फिरून वीज बिल भरण्याविषयी सूचना देत आहे. तरी वीज बिल माफ करावे असे निवेदन कोचुर येथील शेतकरी वर्गाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सावदा येथे दिले आहे.
शेतकरी वर्ग गेल्या चार वर्षापासून फार मोठ्या संकटात सापडला आहे. वेळेवर पाउस नाही व नको असतांना अतिवृस्टी झाली, वादळ वाऱ्यामुळे शेतक-यांचा केळीच्या उभ्या बागा पडल्या तसेच कोरोना काळात केळीला मातीमोल भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी डबघाईला आलेला असल्याने शेतकरी वीजबिल भरू शकत नसल्याने वीज बिल माफ करावे व सवलतीची वीजबिल वसुली थांबवून विजकनेक्शन खंडित होण्यापासून रोखावे अन्यथा सर्व शेतकरी कायदेशीर मार्गाने आंदोलन करतील असा इशारा निवेदना द्वारे शेतकरी वर्गाने केलेला आहे. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेती पंपाचे कनेक्शन कट न करण्याचे आदेश काढणार असे देखील सांगितले.