सावदा येथे न.पा. हद्दीत समाविष्ट गौसियानगर,सह विविध भागात लवकरच सुरू होणार गटारी व रस्त्यांचे काम…

सावदा प्रतिनिधी

सावदा :- जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात असलेल्या गौसियानगर, ताजुशशरियानगर, मदिना नगर इत्यादी भागात अनेक वर्षापासून गटारी व रस्त्यांची मोठी समस्या होती पावसाळ्याच्या दिवसात येथील लोकांना ये-जा करण्यामध्ये मोठी कसरत करावी लागत होती वाटेल त्या ठिकाणी पावसाळ्याचे पाऊस साचलेले असते त्यामुळे मोठी दुर्गंधी व डांस मच्छरांचा साम्राज्य निर्माण होऊन येथील रहिवासी लोकांचे आरोग्य सुद्धा नेहमी धोक्यात पडलेले दिसत होते सदरची समस्या कायमची दूर व्हावी याकरिता अनेक वेळा येथील परिसराचे रहिवाशांनी पालिकेत आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्याकडे गटारी व रस्त्यांकरिता सामूहिक मागणी केली होती.

परिणामी आज दिनांक १७ जुन २०२१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारात सदरचे सर्व ठिकाणांची मुख्याधिकारी श्री सौरभ द जोशी, राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण, इंजिनीयर अविनाश गवळे, कॉन्ट्रॅक्टर सतीश पाटील,सह या भागातील रहिवासी नागरिकांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून फायनल सर्वे करण्यात आला यावेळी सदर भागातील रहिवासी लोकांची कायमची समस्या दूर होणार म्हणून त्यांनी आनंदी होऊन उत्साहीतपणे आभार मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!