सावद्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते “खंडेराव” देवस्थान सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न..
सावदा प्रतिनिधी – ( प्रदीप कुलकर्णी ) यांचेकडून..
सावदा येथील स्थानिक व परिसरातील भक्त गणाचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन खंडोबा देवस्थान (मंदिर) येथे आज रोजी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे कि, सावदा ता. रावेर येथे पुरातन कालापासून असलेले खंडोबा देव, म्हाळसा व बानु देवी यांचे मंदिर स्थित आहे. तसेच परिसरातील लोकांचे कुलदैवत सुद्धा आहे. याठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते तसेच १२ गाड्या ओढल्या जातात. या ठिकाणी नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. सदर याठिकाणी सभामंडप नसल्याने, भाविकांची राहण्याची वेवस्था नसल्याने भाविकांना त्रास होत होता. याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांच्या हि बाब लक्षात आणून दिल्याने त्यांनी हि गोष्ट बांधकामासाठी जिल्हा नियोजन मंडळात अध्यक्ष असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगून खंडेराव मंदिर संस्थान करिता सभामंडप निधी मंजूर करून घेतला. अनुषंगाने आज रोजी आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षते खाली शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री याचे निधीतून आठवडे बाजारातील खंडोबा देवस्थान येथे सभामंडपाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील याचे हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, सत्ता हे साधन आहे साध्य नाही, ज्या दिवशी तुमची सत्ता गेली त्या दिवशी तुमचा विषय संपला, आपल्या मनात हाच विचार असला पाहिजे माणसाने माणसाळलेल्या माणसासारख काम करण हे लोकप्रतिनिधीचे काम आहे. आपण माणूस म्हणून माणसा सारख वागल पाहिजे. जात धर्म ना ग्रंथ आडवा आणता काम केले पाहिजे. कामच तुमच जीवन आहे. यावेळी पालकमंत्री यांना खंडोबा देवस्थान परिसराला वॉल कंपाऊंड करून देण्यासाठीचे सुद्धा निवेदन दिले व ते लवकरच करून देण्याची ग्वाही सुद्धा पालकमंत्री यांनी दिली.
कार्यक्रमा दरम्यान सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, तालुका उपाध्यक्ष योगीराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुजत परदेशी, भरत नेहते, शाम पाटील, शरद भारंबे, राहुल पवार, नंदू पाटील सर, स्वामीनारायण मंदिरातील स्वामी धर्म प्रसाद दासजी, रावेर माजी नगराध्यक्ष महाजन, सावदा नगरपालिका मुख्याधीकारी किशोर चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, तसेच मान्यवर व
भक्तगण उपस्थित होते.
________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण सावदा परिसरातील बातमी 9404191175 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप कुलकर्णी
सावदा प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9404191175