सावदा येथील साक्षी सापकर हीचे ‘STARDUST’ कडून World’s Largest Anthology सोबत सहा जागतिक विक्रम केले नावावर.
सावदा परिसर प्रतिनिधी
सावदा ता. रावेर या ग्रामीण भागातील तरुणी साक्षी सापकर हीने आपले नाव जागतिक विक्रमात नोंदवून आपल्या गावाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे.
भारतातील एका नामांकित संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत साक्षी हिने सहभाग नोंदवला होता.त्यात तिने Quotes या प्रकारात सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे.या संस्थेचे भारतीय समन्वयक व दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक श्री. हेमंत बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.
साक्षी हिने quotes या प्रकारात सहभाग घेतला होता. त्यात तिला कमीत कमी शब्दात आपले विचार मांडायचे होते. यात साक्षीने एकविस शब्दांमध्ये आपले विचार मांडले.जगभरातील आठ हजार लेखकांपैकी दोन हजार लेखकांची या स्पर्धेद्वारे निवड झाली.या दोन हजार लेखकांमध्ये साक्षी हिचे ही विचार निवडले गेले.या सर्व लेखकांचे हे विचार श्री. हेमंत बंसल यांनी पुस्तक स्वरुपात प्रकाशित केले. ‘STARDUST’ या पुस्तकात सर्व साहित्याचे एकत्रीकरण केले गेले. यात काही लेख व कविता सुद्धा आहेत.
‘STARDUST’ ने World’s Largest Anthology सोबत तब्बल सहा जागतिक विक्रम आपल्या नावे केले आहेत. साक्षीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.साक्षी ही सावदा येथील शिक्षक श्री. गणेश सापकर यांची कन्या आहे.