पुढच्या वर्षी लवकर या ! म्हणत पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला साधेपणाने निरोप..

सावदा प्रतिनिधी – ( प्रदिप कुळकर्णी )

येथील वैशाली नगर मधील वैशाली नगर गणेश मंडळाच्या भक्तांनी अगदी साधेपणाने बाप्पाला निरोप दिला.

शुक्रवारी आपल्या भक्तांकडे गणरायांचं आगमन झालं ते ही अगदी साधे पणाने त्यानंतर आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तांनी निरोप दिला आहे. ना गुलालांची उधळण, ना ढोलताशाचा दणदणाट तरीही गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा घोषणा देत विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला गेला.

यंदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. पण कोरोना साथीचे संकट अजून पूर्ण न गेल्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग पाळत शांततेत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

आपल्या बाप्पाला शांततेत विसर्जन स्थळावर नेलं. त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे आरती करण्यात आली. यावेळी गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी कुणी बाप्पासोबत फोटो काढले तर कुणी सेल्फी घेताना पहायला मिळालं. त्यानंतर गणरायाचं भावपूर्ण निरोप दिला व बाप्पाला जातांना कोरोना सारखा महाभयंकर आजार घेऊन जावे व सर्वाँना सुखसमृद्धी चे जीवन द्यावे ही प्रार्थना देखील केली. यावेळी अध्यक्ष श्रीराम कोळी, उपअध्यक्ष निरंजन पाटील, खजिंदार जयेश थोंबरे, कार्यकर्ते – सौराभ जावडे, जयेश होले, मयूर राणे, सोहित चौधरी,प्रणव फिरके,कार्तिक इंगडे, नीरज पाटिल, भूषण सूर्यवंशी, तसेच प्रतिष्ठित मनोज पाटील, सुहाश थोंबरे , सुनील इंगले, अशोक राणे हे देखील उपस्थित होते.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!