भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल तालुका यांनी राबविला रक्षाबंधन म्हणजे सुरक्षा बंधन

सावदा प्रतिनिधी – ( प्रदीप कुलकर्णी )

फैजपुर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला या प्रसंगी API वानखेडे सरांनी मार्गदर्शन केले तर PSI रोहिदास ठोंबरे सर,हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे सर,कॉन्स्टेबल चेतन सर,कॉन्स्टेबल बाळू सर,ASI हेमंतकुमार सर,कॉन्स्टेबल विनोद सर, लोकमत पत्रकार निलेश सर, लोकमत पत्रकार वासुदेव सर,तरुण भारत पत्रकार संजय सराफ सर,तसेच खाचणे हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल,हिरवाडे हॉस्पिटलमध्ये जाऊन देखील ड्रॉक्टरांना युवा परिषदेतील युवती सदस्यांनी राखी बांधली, त्याप्रसंगी तालुका समन्वय साक्षी यांनि त्यांच्या वक्तव्यात सांगितले रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीचा विशेष क्षण असतो,ह्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते,व भाऊ तिचे रक्षण करायचे वचन देतो,परंतु कोरोना काळात सामाजातील पोलीस,पत्रकार, ड्रॉक्टर हा असा घटक होता ज्यांनी सामाजातील प्रत्येक घटकांच रक्षण केले,आपलं कुटुंब आपलं स्वास्थ्य या सर्वी कडे दुर्लक्ष ठेवत त्यांनी सामाजाची पाठराखण केली,अर्थात माणूसकी च उत्तम उदाहरण बनून जगासमोर आले,त्यावर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे सर यांनी तरुणांना योग्य ती वाट दाखवली,युवा हे उत्तम नेतृत्व करू शकतात,संघर्ष हा माणसाला नवीन वाटेवर नेऊन यशाचे शिखर गाठतो असे वक्तव्य त्यांनी सांगितले, तर सर्व ड्रॉक्टरांनी देखील खूप कौतुकाची आपुलकी ची थाप सर्वांना दिली,या प्रसंगी तालुका सचिव आशिष बोरोले,तालुका सचिव विनोद कोल्हे, तालुका समन्वयक साक्षी पाटील,तालुका सदस्य नेहा पून्नासे,पूर्वा भंगाळे, जयमाला चौधरी, पल्लवी तायडे, शीतल तायडे,डिगंबर चौधरी,गौरव जी,लोकेश जी उपस्थित होते,
अशा प्रकारे आगळा वेगळा उपक्रम युवा परिषेदेने साजरा केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!