याही वर्षी बाप्पांच्या मूर्ती लहानच कोरोनाचा फटका – राज्य सरकारने लावली नियमावली

सावदा प्रतिनिधी-

संपूर्ण जगाचा आराध्यदैवत असणाऱ्या श्रींच्या आगमनाची चाहुल लागली आहे. गतवर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते.
याचा सर्वाधिक फटका गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर झालेला आहे. त्यामुळे याही वर्षी गणेश मूर्तीकारांनी मोठ्या मूर्तींना फाटा देत छोट्या मूर्ती करण्याकडे
भर दिला आहे. गेल्या दोन वर्ष संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. या रोगाचा संसर्ग पसरू नये या साठी फार मोठे निर्बंध लावले जात आहेत. सातत्याने होत
असलेल्या लँकडाउनचा फटका मूर्ती कार्गीराना बसला आहे. गतवर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात आली.
त्यामुळे अनेक गणेश मूर्ती कारागिरानी मोठ्या मुती बनवल्या होत्या. परंतु कोरोनाच्या निर्बधामुळे मोठ्या मोठ्या प्रमाणात बनवलेल्या मूर्ती विक्रीअभावी शिल्लक
राहिल्या आहे. याचा फार मोठा फटका मूर्ती कारागिरांना बसला आहे. याचाच परीणाम म्हणून याहीवर्षी मूर्तीकारांनी छोट्या मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे.

कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांनाही बसला आहे. शिर्डीचं साईबाबा मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. मुंबईतील
सिद्धिविनायक मंदिर, माहूर गडावरील रेणुका देवी आणि नाशिक मधील सप्तशृंगी देवी या सर्व या देवस्थानांना दररोज हजारो भाविक भेट देतात, पण यंदा
कोरोनाच्या भीतीने सर्व मंदिर बंद असल्याने पूर्ण पणे शांतता पसरली आहे.

राज्यात अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गावागावात आणि घरोघरी बाप्पांच्या मूर्तींची स्थापना केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या या
उत्सवादरम्यान नातेवाईकांचं घरी येणं जाणं होत असतं. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात देखील तरूणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमुळे कोरोना
विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सुद्धा गणेशोत्सवासाठी काही नियमावली
जाहीर केली आहे. गृह विभागाच्या सूचनेनुसार, सरकारने गणेश मूर्तीची उंची जाहीर केली आहे. यात घरगुती गणेशाची मूर्ती ही 2 फूट तर सार्वजनिक मंडळासाठी 4
फूटांची मूर्ती हवी, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी गरजेची राहणार असून कोरोनाचा संसर्ग पाहून उत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच गणेश मूर्तींचं
विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी, गणेशोत्सव मंडळांनी नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी, गणेशोत्सवादरम्यान मंडप
परिसरात होणारी गर्दी टाळावी, सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्यविषयक जनजागृती करणारे कार्यक्रम राबवावेत, आरती, भजन किंवा किर्तन या कार्यक्रमांना होणारी
गर्दी टाळावी, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे, गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात यावी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!