हद्दवाढ झालेल्या नवीन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रीक पोल एलीडी लाईट बसवा : राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
सावदा – प्रतिनिधी
येथील सावदा नगर परिषदेची नविन हद्दवाढ गौसिया नगर, मदिना नगर, रजानगर पनापीर नगर कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या मागिल भाग, झाल्यापासून या नविन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रीक पोल व एल.इ.डी. लाईट बसवण्यात आलेले नाही.
ज्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रीक पोलची गरज आहे त्या त्या ठीकाणी पोल टाकुन एल.इ.डी. लाईट लाईट बसवावे. तसेच ज्या
इलेक्ट्रीक पोल वर स्ट्रीट लाईट कंडक्टर (स्ट्रीट तार) नाही तेथे ते त्वरित टाकुन मिळावी. नविन क्षेत्र हे शेती शिवाराला लागून
असल्याने अनेक साप तसेच जंगली प्राणी येत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. मा. आमदार
यांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून हे काम त्वरीत करुन मिळावे. अशी मागणी राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षातर्फे नगरसेवक व तथा गटनेता फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या
निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नगरसेविका नाजेराबी इस्तीयक बागवान, शकील शे बशीर, इस्माईल युसुफ,
कमुद्दिन शे रफिक, नाजिम शे नजीर, शे. नाबीद शे. फिरोज आदींची स्वाक्षरी आहे.