जे चिल्लर घेतात अन् डॉलर बारामतीला पाठवतात त्यांनाच राष्ट्रवादी गृहमंत्री करते, पडळकरांचा निशाणा
सातारा,
चिल्लर घेऊन डॉलर बारामतीला पाठवणार्या, गरिब तोंडाच्या व्यक्तिलाच राष्ट्रवादी गृहमंत्री करते. जयंत पाटीलसाहेब ते दरोडेखोराला गृहमंत्रीपद देत नाहीत. वाझेला वेळीच निलंबित केलं असतं तर आज राज्याच्या गृहमंत्र्यांना तोंड लपवत फिरायची वेळ आली नसती, असा घाणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग-ेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी भाजपा आमदार जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग-ेसवर हल्ला चढवताना आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली. अंबानींच्या घराबाहेरील जिलेटीन प्रकरणी आणि मनसूख हिरेनच्या खून प्रकरणात एपीआय वाझेला वेळीच निलंबित केले असतें, तर आज राज्याच्या गृहमंत्र्यांना(माजी) तोंड लपवत फिरायची वेळ आली नसती, अशी टीका पडळकर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली.
पडळकर पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे गृहमंत्री चिल्लर खातात आणि डॉलर पवारांकडे जमा करातात, अशीच व्यक्ती असते. पवारांची गृहमंत्र्याची निवड करायची ही विशिष्ट पद्धत आहे. आर.आर आबा चिल्लर घेणार, डॉलर बारामतीला पाठवणार, त्यानंतर अनिल देशमुख गेले. त्यानंतर आता माझा नंबर लागणार म्हणून जयंत पाटील गृहमंत्रीपदासाठी टपून बसले होते. मात्र पवार दरोडेखोराला गृहमंत्रीपद देत नाहीत. ते प्रामाणिकपणे चिल्लर गोळा करुन बाकीच्या नोटा सुप्रियाताईंकडे जमा करेल त्यालाच गृहमंत्रीपद देतात. दुसर्या-तिसर्याला हे पद मिळत नाही, असा विखारी टोला त्यांनी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना लगावला आहे.
1999 पासूनची परंपरा पाहिली तर गरीब तोंडाच्या गड्यालाच राष्ट्रवादीने गृहमंत्री केले आहे. अजित पवार दोन-चार वेळा मलाच गृहमंत्री करा म्हणून रुसून बसले होते. पण ते जर हिशोबच जमा करत नसतील तर त्यांना गृहमंत्री कसं करणार? सगळं ढापलं तर तुम्ही तिकडं पोती भरुन ठेवणार, मग तुम्हांला गृहमंत्री ते कसे करतील असा टोला देखील त्यांनी अजित पवार यांना लगावला.
यापूर्वीच दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री करणार होते. पण त्यांनी प्रकृतीचं कारण दिल्यामुळे अनिल देशमुख गृहमंत्री झाले. मात्र, आता देशमुख गेले अन् वळसे पाटील आले. पंरतु पाटीलसाहेब सावध रहा, लई काय भानगडीत पडू नका. आता या पवारांच्या पापाचा घडा भरत आलाय. कधी लवंडल सांगता येत नाही. म्हणून राष्ट्रवादीवाल्यांनो जरा जपून रहावा. तुमचा शेवटचा मुक्काम तुरुंगातच होऊ शकतो, इतरत्र होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.