तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली, दि. 15 – : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी. असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते, यावेळी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यंवशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितिन कापडनिस, प्रभारी अप्पर जिल्हाधिकरी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, मिरज शासकीयचे डॉ. दिक्षीत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तीसऱ्या लाटेत दिडशे पट रुग्णसंख्या वाढेल असा तज्ज्ञांचे मत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयार ठेवावी, ऑक्सिजन साठवण क्षमता व ऑक्सिजन जनरेशन प्लांट या बाबत योग्य नियोजन करावे, तीसऱ्या लाटमध्ये दोन हजारच्यावर ऑक्सिजन रुग्ण्संख्या झाल्यास परत लॉकडाऊन होणार याची स्पष्ट कल्पना त्यांनी दिली. पहिल्या लाटे प्रमाणेच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना अधिक लवकर निदानासाठी मोटीव्हेट करावे, मोहिम स्वरुपात प्रत्येकाने काम करावे, लक्षणे दिसू लागताच टेस्टिंग करुन औषधोपचार सुरु केले पाहिजे. तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजनसाठी टास्क फोर्स तयार करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने औषध साठा करुन ठेवावा, गर्दी टाळण्यासाठी व संसर्ग टाळयासाठी दुकानदारांनी घरपोच डिलिव्हरी साठी मॅक्यानिझम तयार ठेवावा अशा सूचना त्यांनी वेळी दिल्या.
यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती नंतर पूरपश्चात परिस्थितीचा आढावा घेतला यामध्ये 38 हजार 494 पंचनामे पुर्ण झाले आहेत. पशुधानाचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. 39 हजार 400 कुटुंबाना धान्य वाटप झाले आहे. 39 हजार 695 हेक्टर कृषी क्षेत्राचे पंचनामे पुर्ण अंतिम झाल्याचे सांगण्यात आले.
000
कृषी विभागाची राणभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची राणभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
नवीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूस कृषी विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात रानभाज्या महोत्सव समारोप व ॲग्री मॉलचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विजयनगर येथे सुरु करण्यात आलेला कृषी मॉलचे भविष्यामध्ये विस्तारीकरण करण्यात यावे, जिल्ह्यातील सेंद्रीय कृषी माल उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी, योग्य दर मिळावा तसेच कृषी मालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन लाभावे यासाठी कृषी विभागाने गतीने काम करावे. जिल्ह्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांची गट तयार करावेत व शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 शेतकरी सेंद्रीय कृषी मालाचे उत्पादन करतात या मालाला ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी भाज्या महोत्सव हा एक चांगला पर्याय आहे. तसेच कृषी विभागाकडून ॲग्री मॉल ही संकल्पना प्रभावी व विस्तारीतपणे राबवावी असे ते म्हणाले.
प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ॲग्रीमॉलचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी सेंद्रीय गुळ, जॅगरी कॅडी, सेंद्रीय हळदीबरोबरच, खिल्लार गाईचे देशी तुप याचा स्वाद घेतला. यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ॲग्री मॉल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ॲग्रीमॉल मध्ये सुमारे 14 शेतकऱ्यांनी व सात सेंद्रीय शेतीमाल उत्पादन कंपन्यांनी सहभाग घेतला होता.