खिरवड येथे लसीकरण शिबिर घेण्याची युवासेनेची मागणी

रावेर प्रतिनिधी

खिरवड येथे बरेच दिवसां पासून कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित केले गेलेले नाही. त्यासाठी ग्रामस्थांना ईतर गावी लसीकरण साठी जावे लागते गावातील अनेक लोक अद्यापही लसीकरण पासून वंचित आहेत गावातच लस उपलब्ध होउन खिरवड ग्रामस्थांची सोय व्हावी यासाठी युवासेना तालुका सचिव जयेश पाटील यांनी रावेर ग्रामीण रुग्णालय येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी एन डी महाजन याचे कडे लसीकरण शिबीर खिरवड येथे आयोजित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपस्थित युवासेना सोशल मीडिया तालुका प्रमुख रावेर कैलास पाचपोहे राहूल जैन रुषभ पाटील उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!