माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रावेर नगरपालिकेतर्फे वृक्षारोपण
रावेर प्रतिनिधी – दि.३०
माझी वसुंधरा २.० अभियानास प्रारंभ झाला असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रमांतर्गत रावेर नगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण व वसुंधराचे संरक्षण करून जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाचा एक भाग आहे. याचा संदेश देण्यात आला.
रावेर न.पा.तर्फे दि. १८ जून पासून पावसाळ्याच्या सुरूवातीस शहरातील विविध भागात व मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात ये आहे. सुरूवात नेमाडे प्लॉट येथील ओपन स्पेस व रस्ते लगत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रावेर न.पा.च्या नागरी घनकचरा प्रकल्पावर ओल्या कचऱ्यापासून बनविण्यात आलेले खत सुद्धा झाडांना टाकण्यात आले. सदर कार्यक्रमास नगरसेवक शेख सादिक, प्रदिप महाजन, कार्यालयीन अधिक्षक सरफराज तडवी, शामकांत काळे, प्रमोद चौधरी, पी. आर. महाजन, शहर समन्वयक वैभव नेहेते यांच्यासह कर्मचारी व पुंडलिक महाजन, ताराचंद बारी, विश्वनाथ भोई, मुन्ना अग्रवाल, अक्षय महाजन, विजय चौधरी, प्रभाकर बारी, श्री. भावसार आदींसह नागरिक उपस्थित होते.