ऐनपुर-सुलवाडी-कोळदा या संथ गतीने होणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुहूर्त गवसला असून कामाला अखेर वेगाने सुरुवात…
दैनिक महाराष्ट्र सारथी ऐनपुर ग्रामीण प्रतिनिधी विजय एस अवसरमल.
रावेर तालुक्यातील ऐनपूर ते कोळदा या रस्त्याला एबीडी अर्थसाहाय्यित (सन 2020/21) अंतर्गत मंजूरी मिळालेली असून त्या रस्त्याच्या कामाला आता वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.
ऐनपुर-सुलवाड़ी-कोळदा रस्ता हा ए बी डी अर्थसाहाय्यित अंतर्गत सन 2020/21 ला मंजूर करण्यात आला होता सदर रस्त्याची लांबी ४.८०किमी एवढी मंजूर आहे. ऐनपुर-कोळदा रस्ता शेतीच्या तसेच सुलवाड़ी व कोळदा ही गावे ऐनपुर सारख्या गावाला लागून असल्यामुळे दळनवळनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो, त्यासंदर्भात परिसरतीत नागरिक तसेच शेतकरी यानी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कामास अवलंब होत होता. सदर रस्त्या बाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वेळेस या रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळालेली होती व या रस्त्याचे काम सुरु होण्याबाबत नागरिकांमधे चर्चा सुरु होती परन्तु आता या ऐनपुर ते कोळदा रस्त्याच्या कामाला चांगलीच गती मिळालेली दिसत असुन कामाला चांगला वेग मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.