सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर येथील कनिष्ठ लाचखाेर लिपीकावर एसीबी’ची कारवाई..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील..

सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर येथील कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज हा अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार करतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला.

रावेर – आज दिनांक 15 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर येथील कनिष्ठ लिपीक अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार करतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
शेख वसीम शेख फयाज असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदाराचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग,रावेर येथून वयोमानाप्रमाणे रितसर सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या ग्रॅज्युएटीची 3,91,710 एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपये व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी पाचशे रुपये अशी एकुण अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी लिपिक शेख वसिम शेख फयाज याने तक्रारदाराकडे केली. या मागणीची पडताळणी पुर्ण झाल्यानंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम घेतांना एसीबीच्या सापळ्यात लिपिक शेख वसिम हा अलगद सापडला.

उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. महेश सोमवंशी आदींन या सापळ्यात सहभाग घेतला.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 9518313832
@ टोल फ्रि क्रं. 1064

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!