देशातील महागाईच्या विरोधात रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन…
रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी ता. रावेर जि.जळगांव यांच्या वतीने धरणे आंदोलन व निवेदन तहसीलदार यांना दिले.
रावेर येथील तालुका वंचित बहुजन आघाडी ता. रावेर जि.जळगांव यांच्या वतीने धरणे आंदोलन व निवेदन तहसीलदार यांना दिले केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या हुकुमशाही पध्दतीने पेट्रोल, डिझेल,एल.पी.जी.गॅस, रासायनिक खते,व इतर जिवनावश्यक वस्तुची दरवाढ या विरोधात केंद्र शासनाच्या निषेधार्थ रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यासाठी आज दिनांक 12/07/2021 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालया समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.1} खाजगी शाळेतील ऑनलाईन शिक्षण मागील व चालु वर्षेची सन 2019/2020, 2020/2021 व सन 2021/2022 या तीन वर्षाची शैक्षणीक फि माफ करण्यात यावी.2}सन 2021 मध्ये चक्रिवादळामुळे रावेर तालुक्यातील शेतक-याच्या केळी बागायतीचे पुर्णपणे नुकसान झाले त्याची तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहीजे.3}ओ बी सी समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे 4}मुस्लीम समाजाला 5 % टक्के आरक्षण मिळाले पाहीजे 5}मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागु करण्यात यावे 6}शासनाने थांबविलेल्या नोकर भरत्या सुरु करण्यात याव्या 7) नवीन रेशन कार्ड तत्काळ मिळावे, नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे 8) संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ वृद्धपकाळ या प्रकरणासाठी शासनाने लावलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात याव्या, २१००० उत्पन्नाची अट शिथिल करण्यात यावी.
रावेर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, रावेर तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, विनोद तायडे रावेर तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अब्बास भाई रावेर शहर अध्यक्ष व इतर सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवेदन दिले.