वाढत्या वीजबिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रासह रावेर तहसील कार्यालय येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून”कंदील भेट आंदोलन”करण्यात आले.

दैनिक महाराष्ट्र सारथी रावेर विवरे प्रतिनिधी राहुल राणे

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे -बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज दि. ६ जुलै मंगळवार रोजी तहसिलदार उषाराणी देवगुणे व पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात आजपर्यंत वेगवेगळी सरकारे वीज बील माफीचा नारा देऊन सत्तेत आली,वीज बील आकारणीच्या संदर्भामध्ये, वीजबिल मोफत देण्याच्या संदर्भामध्ये, लोडशेडींग संदर्भामध्ये कोणतेही सरकार आज बोलतांना दिसत नाहीय,लाॅकडाऊन मध्ये दिड वर्षांपासून गरीब जनता बेरोजगार झाल्याने आज वीज बील भरण्याची परिस्थिती आज सर्वसामान्यांची राहीलेली नाही,आणि अशातच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या काळात वाट्टेल ते वीजबिल आकारुन जनतेची लुट या देशात चालु आहे,आणि म्हणुन बहुजन मुक्ती पार्टी द्वारे संपुर्ण महाराष्ट्रासह रावेर तालुक्यात तहसील कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका प्रभारी मा.विशाल तायडे यांचे नेतृत्व मध्ये आंदोलन करण्यात आले, वाढत्या वीजबिलाच्या विरोधात नारे देण्यात आले, व सन्माननीय तहसीलदार मॅडम मा.ऊषाराणी देवगुणे यांना निवेदन देउन सरकारला कंदिल देण्यात आला,अशा प्रकारे वीजसंदर्भात गंभीर मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले,प्रसंगी भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा.नितिन गाढे,जमाएते ईस्लामी हिंदचे पदाधिकारी मा.शेख शफिऊद्दीन सर,नगरसेवक असद सर, सिद्धार्थ तायडे,अक्षय तायडे,सचिन तायडे,राजु तायडे,अजय तायडे,बापू सोनवणे,राहुल सोनवणे व इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!