बलवाडी ,खिर्डी येथे अवैध देशी, हातभट्टी दारू विक्री जोमात, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात..

रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )

रावेर तालुक्यातील बलवाडी, खिर्डी परिसर भागात अवैद्य रित्या देशी व हातभट्टी दारुची मोटर सायकल वर बसून मोठ्या प्रमाणात खिर्डीच्या बस स्टँड वर तस्करी होत आहे.बलवाडी मध्ये नदीच्या काठावर दीन दहाडे अवैध दारू विक्री होत असुन याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होतेच आहे परंतु हा परिसर जवळच असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत राजरोस पणे होताना दिसत आहे.यामुळे परिसरातील अनेक गावातील तरुण पीढी सुध्दा दारुच्या आहारी गेली आहे.तसेच तळीराम दिवसभर देशी व हातभट्टीची दारू पिऊन गावभर फिरतात यामुळे येथून जाणाऱ्या येणार्या सर्वसामान्य लोकांना तळीरामांपासुन ञास होत आहे,दारुमुळे कित्येकांचे संसार देशोधडीला लागले आहे.माञ याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तसेच या भागातील अनेक गावांमध्ये अवैध देशी व हातभट्टी दारुची विक्री होत आहे. यामुळे तळीरामांना तर चांगलेच फावले आहे. परिसरातील आजूबाजूच्या
गावांमध्ये “दिन दहाडे” अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री धंद्यांना उत आला असुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहेच परंतु हद्दीत असलेल्या निंभोरा पोलिस स्टेशन पोलिसांचे या अवैद्य धंद्यावाल्याशी साटेलोटे आहे असे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे .निंभोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील परिसरात कुठे काय अवैध व्यवसाय सुरू आहेत याची माहिती असूनही वेळीच योग्य ती कारवाई केली जात नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना नेहमी होत असतो .

_______________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 9156117255 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9156117255

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!