दसनूर आस्था नगरी येथे आज प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न….

दसनूर प्रतिनिधी – ( पुरुषोत्तम संगपाळ )

दसनूर येथे प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला आज प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, खिर्डी येथील बालू महाराज व त्यांचे चिरंजी व अभिशेक महाराज या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या सानिध्यात पार पडला
या वेळेस गावातील विठ्ठल रावजी महाजन यांच्या हस्ते महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचा सत्कार केला गेला व महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज यचा सत्कार सुनील शावराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यात डिगंबर राजाराम पाटील, महेश काशीनाथ चौधरी ,नारायण क्रुष्णा महाजन, भगवान महाजन, साचिल पाटील, चंद्रकांत संगपाळ, जगदीश एकनाथ, एस जी महाजन सर संदिप नारायण महाजन स्नेहल सर ,गावचे सरपंच व सर्व सदस्य,नितीन गंभीर, प्रशांत काळे, सचिन चौधरी आणि सर्व ग्रामस्थ या सोहळ्यात उपस्थित होते
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा पार पडला या वेळी जनार्दन महाराज यांच्या प्रवचनात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करतांना ते म्हणाले दसनूर भागातील शेतकरी हे खूप मेहनती आहे या भागातील तरुणांमध्ये शेती मध्ये आस्था आहे व शेतीमध्ये अँडव्हांस टेक्नॉलॉजी वापरून शेतीत प्रयोग करून जास्तीत जास्त वापर करून भरघोस पीक घेत आहात त्याबद्दल तरुणांचे अभिनंदन केले.


त्याच बरोबर शेतकरी मुलांना शेती व वैभव देत आहात पण त्याच बरोबर मुलांना संस्कार पण देणे गरजेचे आहे असे महाराज म्हणाले
त्या नंतर महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज यांनी आपले मत मडले त्यांनी पण दसनूर करांना राम मंदिराच्या उभारणी साठी अभिनंदन केले
या वेळेस मान्यवरांनी सर्व गावकर्‍यांना उपदेश करताना त्यांनी सांगितले की आपण आपल्या मुलांना पैसा शेती तर देत आहोत पण त्या सोबत आपल्या मुलांना संस्कार देनही गरजेचे आहे व समाधानी असणेही गरजेचे आहे व आपण आपले चरित्रात राम उतरवून दररोज प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करावी असा नियम लागू अंगीकारन्याचा सल्ला मान्यवरांनी सर्व तरुणांना दिला व आपले चरित्र प्रभू श्रीराम यांच्या सारखे घडवण्याचा प्रयत्न करावे
या वेळेस गावातील व सर्व ग्रामस्थांनी सहयोग करावा व खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केले
व आपल्या सर्वांच्या सहयोगाने मंदिर उभारणी केली जाईल व गावातीलच नाही तर आपल्या परिसरातील दात्यांनीहि आप आपल्या परीने सहयोग करावा ही विनंती..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!