निसर्ग मित्र समिती तर्फे फटाके मुक्त अभियान..!

घाटे ए.एस.विद्यालय व ज्यु. कॉलेज उचंदे येथून अभियानास सुरवात..!

रावेर तालुका प्रतिनिधी:- (प्रदीप महाराज)

मुक्ताईनगर तालुका निसर्ग मित्र समिती तर्फे यंदा कोरना सारख्या महामारी मुळे समाजात तयार झालेली आर्थिक विषमता,मोठ्या प्रमाणावर झालेली बेरोजगारी तथा दिवाळी मुळे प्रचंड मोठ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निसर्गातील आपल्या सजीव घटकांना होणारा विपरीत असा परिणाम या परिणामांपासून प्रत्येक सजीवाला संरक्षण मिळवण्यासाठी निसर्ग मित्र समिती तालुका मुक्ताईनगर च्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी अभियानाचे आयोजन करण्यात आले.या अभियानाची सुरुवात घाटे ए एस विद्यालय व ज्युनियर कॉलेज उचंदे तालुका मुक्ताईनगर येथून करण्यात आली.या अभियानाच्या अंतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी एक शपथ दिली जाते. ही शपथ व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ताईनगर तालुका निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रीय हरित सेना शिक्षक प्रशांतराज तायडे सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम बी महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून आपण फोडत असलेल्या फटाक्यांमुळे आपल्या सभोवताली राहणाऱ्या आपल्या सहजीवी सजीवांना याचा किती घातक परिणाम होत असतो त्यामधून त्यांचे व आपले शारीरिक व मानसिक प्रचंड हाल होतात. वयाचे दुर्गम परिणाम शरीरावर होत असतात फटाके हातात फुटल्याने त्वचेचे आजार सुद्धा उद्भवू शकतात.अशा प्रकारे अध्यक्षीय भाषणांमधून विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच फटाकेमुक्त अभियानामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मार्गदर्शन पर आव्हान केले. यावेळी फटाके मुक्त अभियाना संदर्भात विद्यार्थ्यांमधून कृष्णा मस्कावदे, आदर्श जाधव, दिपक मोसे, आदित्य इंगळे, कृष्णल नमायते,भूषण पाटील ,उपासना पाटील ,दिपाली सावळे ,सोनाली मोसे या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त अभियाना संदर्भात त्याचे महत्व विषयक आपली मनोगते व्यक्त करून या अभियानास जास्तीत जास्त जनजागृती प्रभावीपणे करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एस. पाटील सर यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना फटाके फोडण्याचे दुष्परिणाम आपल्या कानांवर व डोळ्यांवर किती घातक असे परिणाम करीत असतात.याविषयीचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक बी डी पाटील डी पी मस्कावदे एस पी पाटील आर एस पाटील, एस एस महाजन, एस एस सरोदे मॅडम आत्माराम पाटील यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार आर के पाटील सर यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्टीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!