रावेर शहरा मध्ये पक्ष संघटन वाढवण्यास अकार्यक्षम असल्यामुळे शहर अध्यक्ष प्रणित महाजन यांचा राजीनामा- जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले

विवरा प्रतिनिधी:- ( चेतन पाटील )

गेले दोन दिवस झाले रावेर शहर अध्यक्ष प्रणित महाजन यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळा मध्ये चर्चा सुरू झाली आहे की,राजीनामा अचानक का ? जिल्हा उपध्यक्ष कुणाल महाले यांनी सांगितले प्रमाणे दी. २० आक्टोबर रोजी झालेल्या पक्ष संघटनेच्या बैठकीत स्व:ता प्रणित महाजन आपले मनोगत व्यक्त करताना बोले मी पक्ष संघटने साठी वेळ देऊ शकत नाही व रावेर शहरा मध्ये संघटना वाढवण्यास अकार्यक्षम आहे असे पक्षाच्या बैठकी मध्ये सांगितल्यामुळे मा. जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या सुचने वरून प्रणीत महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, व जिल्हा अध्यक्ष यांनी तो राजीनामा स्विकारला आहे
जिल्हा कार्याध्यक्ष मा. दिपक पाटील यांनी सांगितले आजच रावेर अक्षध्य पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे, पक्ष कधी कोणा साठी थामत नसतो, आणि कधी थामनार सुध्दा नाही असे बोलताना त्यानी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!