इंधन दरवाढी विरोधात रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन
रावेर प्रतिनीधी(प्रमोद कोंडे.mob no -9922358586)
देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीविरोधात रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.
रावेर तालुक्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत राहून रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी, तालुकाध्यक्ष निलकंठ चौधरी, युवक तालुकाध्यक्ष सचिन रमेश पाटील, किशोर पाटील, कुणाल महाले जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकांत चौधरी, सिद्धार्थ तायडेसर, प्रणित महाजन,पं.स.सदस्य योगेश पाटील,नदीम शेख आदी उपस्थित होते.