मनोरंजन मंडळ रेल्वे डाक सेवा भुसावळच्या २५ गिर्यारोहकांनी केली कळसुबाई शिखराची यशस्वी मोहीम

◆भुसावळच्या २५ तरुणांनी गाठले कळसुबाई

◆भुसावळच्या तरुणांकडून महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सर

कळसुबाई : महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर मोहीम यशस्वी केल्यावर जल्लोश साजरा करताना जिल्ह्यातील गिर्यारोहक

रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )

रेल्वे डाक सेवा, भुसावळच्या मनोरंजन मंडळातर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसुबाई शिखर गिर्यारोहणात येथील २५ गिर्यारोहकांनी सहभाग घेऊन यशस्वीपणे कळसुबाई शिखर सर केले. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखर आहे.
मनोरंजन मंडळ भुसावळ रेल्वे डाक सेवेच्या २५ सदस्यांनी रेल्वेने इगतपुरी तेथून बसने कळसूबाईच्या पायथ्याशी असलेले बारी गाव गाठले आणि सकाळी ८ वाजता बारी गावातून ट्रेकला सुरुवात केली. निसर्गरम्य वातावरणात सह्याद्रीचे मनमोहक रुप न्याहाळत मोठ्या उत्साहात सगळे सदस्य दुपारी १२ वाजेपर्यंत शिखरावर पोहचले. कठीण चढाई व पाऊसपाण्याची तमा न बाळगता मोठ्या हिमतीने सगळ्यांनी कळसुबाई शिखर सर केले. यानिमित्ताने रेल्वे डाक सेवा, भुसावळचे अधीक्षक आर. बी. रनाळकर, उपअधीक्षक आर. यु. नेहरकर, निरीक्षक डी. जी. सर्जेराव, मनोरंजन मंडळाचे सचिव डी. ए. काळमेघ, आयोजक राजपालसिंग राजपुत यांनी सर्व सहभागी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!