दै. महाराष्ट्र सारथी चा दणका….
खिर्डी बस स्टँड वरचा धापा झाला दुरुस्त….
रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )
खिर्डी गावात जाणारा मुख्य रस्त्याच्या आणि खिर्डीमधून ऐनपूर कडे जाणारा मेन रस्ताच्या मोठ्या गटारीवर असणारा
बस स्टँड जवळील सद्गुरू कापड दुकाना समोरील धापा बरेच दिवसापासून वाईट स्थितीत दिसून येत होता. येणारे जाणारे मोठे वाहनधारकांना तो रस्ता बदलून गावाला वेढा देऊन यावे लागत होते या रस्त्याकडे ,ना…ग्रामसेवक ना…ग्रामपंचायत कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते म्हणून दै.महाराष्ट्र सारथी आवाज उठवला आणि आपल्या वेबसाईटवर बघा ना हो! ग्रामसेवक खिर्डी च्या बस स्टँड वरचा धापाकडे या शिर्षकाखाली बातमी लावली आणि लागलीच धापा दुरुस्त करण्यात आला.गावकऱ्यांनी दैनिक महाराष्ट्र सारथी चे आभार व्यक्त केले.
________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888