33/11/ केव्ही उपकेंद्र खानापूर (कक्ष) येथे 12 कर्मचाऱ्यां ऐवजी फक्त पाच कर्मचारी कामावर..
खानापूर प्रतिनिधी: ( उमाकांत मराठे )
सविस्तर वृत्त असे की खानापूर येथे महावितरण 33/11 / के व्ही उपकेंद्रावर एकूण बारा कर्मचाऱ्यांच्या जागा आहेत परंतु आज रोजी खानापूर महावितरण उपकेंद्राचे काम पाहण्यासाठी फक्त पाच कर्मचारी कार्यरत सुरू आहे या कर्मचाऱ्यांना सात गावे पहावे लागत आहे खानापूर अजनाड अटवाडा निरूळ पाडला बु. पडला खु. चोरवड परंतु हा विभाग मोठा असल्याने पाच कर्मचाऱ्यांना हे पाहणे शक्य होत नसल्याने मात्र विज ग्राहकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे त्याचे कारण असे की रोज संध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने हवा पाणी व विजेच्या तारांवरती लांबलेल्या झाडांच्या फांद्या मुळे रोज कुठे ना कुठे फॉल्ट होत असतात परंतु एका कर्मचाऱ्याला दोन-दोन गावांचा चार्ज देवुन सुध्दा कर्मचाऱ्यांना काम पाहणे शक्य होत नाही व ऐनवेळी सेवा देणे अशक्य झाले आहे कारण असं की खानापूर उपकेंद्र असून देखील एकही कर्मचारी स्थानिक ठिकाणी पातळीवर राहत नाही काही फॉल्ट झाल्यावर वायरमन कर्मचारी लगेच येतील याची कुठलीही गॅरंटी नाही स्थानिक ठिकाणी कर्मचारी राहायला पाहिजे अशी भावना विज ग्राहकांमध्ये सुरू आहे व असे जर झाले तर कुठलीही समस्या निर्माण झाली तर ज्या गावांमध्ये कर्मचारी राहतात त्या ठिकाणी समस्या वेळेवर सुटेल अशी अपेक्षा वीजग्राहकांनामध्ये व्यक्त होत आहेत आणि खानापूर महावितरण उपकेंद्र असून देखील कर्मचारी संख्या जास्त असायला पाहिजे परंतु विभाग मोठा असून देखील येथे कर्मचारी कमी आहे आहे याची दखल वरिष्ठ अभियंता यांनी समजून घ्यायला पाहिजे व त्वरित खानापूर उपकेंद्रासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून ग्राहकांना वेळेवर सेवा मिळावी अशी वीज ग्राहकांची विनंती आहे.