सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या चेह-यावर हास्य तरळले — स्वामी परिवाराकडुन कपडे वाटप..
प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे )
रावेर तालुका परिसरात विविध क्षेत्रात समाजसेवा करणारे स्वामी परिवाराचे अध्यक्ष व समाजसेवक श्री.रविंद्र राजाराम पवार यांच्या स्वामी परिवारा मार्फत राबविण्यात येत असलेल्या कपडा बॅक या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 2 ऑक्टोबर 2021 शनिवार रोजी सातपुड्याच्या कुशित राहत असलेल्या आदिवासी दुर्गम मोरव्हाल, जिनसी व सुळ्या बर्डी या भागात कपडे वाटप करण्यात आले, स्वामी परिवारांकडुन रावेर शहरासह जळगाव जिल्ह्यात जुने कपडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत जवळपास हजारो लोकांना पुरतील एवढे वापरण्यायोग्य कपडे स्वामी परिवाराकडे जमा करण्यात आले होते, जमा कपड्यांना स्वामी परिवारातील सदस्यांनी स्वच्छ धुवून इस्त्री करून नविन कपड्यांप्रमाणे पॅकिंग करून गरजू लोकांपर्यंत पोहचविले,
गेल्या अनेक वर्षापासून स्वामी परिवाकडुन सदर उपक्रम कपडा बँक मार्फत राबविण्यात येत असतो, आजपर्यंत सातपुड्याच्या कुशित राहत असलेल्या जवळपास 13 गावांना वर्षभरातून दोनदा जावून कपडे वाटप केले जाते, कपडा बॅंकेच्या या उपक्रम यशस्वीतेसाठी स्वामी परिवाराचे राजू पवार, हिरकणी बोरोले, किर्ती कानुगो, साधना बुवा, रुपेश पाटील, विलास महाजन, प्रविण चौधरी, वर्षा साठे,अनिता शिंदे, शेखर वाणी, योगेश पाटील, दिलीप पवार, हरलाल पवार, सुनिल भीलाला, जावेद तडवी, यांचेसह सुमारे 150 सदस्य वर्षभर मेहनत घेत असतात.