महात्मा गांधी जयंती व पॅन इंडिया अवेअरनेस, लिगल अवेअरनेस प्रोग्राम आणि विनामुल्य विधी सेवा संदर्भात रावेर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मा. सवोच्च न्यायालय, भारत सरकार, मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती रावेर व तालुका वकील संघ, रावर याचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणा-या विविध कार्यकमांचे उद्घाटन करण्यात आले. दि.०२ अक्टिाबर २०२१ महात्मा गांधी जयंती व पॅन इंडिया अवेअरनेस. लिगल अवेअरनेस प्रोग्राम आणि विनामुल्य विधी सेवा संदर्भात रावेर शहरात भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले. आयोजित रॅली तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन न्या.मा श्री अनंत एच. बाजड साहेब,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधिश रावेर यांच्या अध्यक्षते खाली तसेच न्या.मा.श्री.आर. एम. लोळगे साहेब सह दिवाणी न्यायाधिश रावेर यांच्या उपस्थितीत पार पडले.रॅली चा मार्ग विद्यादान कोचिंग क्लासेस,छोरीया मार्केट,रावेर येथुन सुरु होवुन मेन रोड, बाजारपेठ, गांधी चौक, आंबेडकर चौक व शेवटी छोरीया मार्केट असा होता. सदर रॅली साठी विद्यादान कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी व शिक्षक, श्री.शांताराम महाजन सर, श्री विनोद पाटील सर, तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड श्री.जगदिश महाजन, उपाध्यक्ष अॅड.श्री. एस बी. सांगळे, सचिव अॅड.श्री.धनराज पाटील, अॅड.जे. व्ही. दाडगे, अॅड. योगेश गजरे, अॅड.श्री.एस. जी. धुंदले, अॅड.श्री एस. बी. चौधरी, अँड.श्री.एन. के. महाजनए अॅड.श्री.के डी. पाटील व इतर वकिल मंडळी. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी श्री.दिपक तायडे, श्री.नितीन चौधरी, पॅरा लिगल वॉलेटीयर्स श्री.बाळकृष्ण पाटील, श्री.राजेंद्र अटकाळे श्री दयाराम मानकरे सौ. सनिता दरेकर, सौ.वर्षा पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी सहा.अधि श्री.ए. एम. सुगधीवाले, श्री.डि. एस. डिवरे, श्री भरत सुरेश बारी, श्री.राहल सोनवणे, श्री.डी जे. साळी, श्री.सतिष रावते, श्री विशाल नाथजोगी रावेर पो. स्टे.पो.नि.नागरे साहेब श्री करोडपती श्री योगेश साळवे श्री कापडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

_____________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!