पाल येथील दादासाहेब वनपरिक्षणला केंद्राला जोडणारा जीर्ण पूल पुरात वाहून गेला….
रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )
पाल येथे मागील आठवड्यापासून जोरदार पाऊसाने जोडपले असून यात सातपुडा पर्वतातील सर्वच नदी नाले भरून वाहू लागल्याने सुकी नदीला मोठा पूर आला यात गावापासून कमीत कमी दीड दोन किमी अंतरावर असलेले दादासाहेब वनप्रशिक्षण संस्थेला जोडणारा पूल वाहून गेला असून पाल येथे वनमंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्यकाळात सन 1961मध्ये येथे दादासाहेब वनप्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली यात दरवर्षी दोनशे ते पाचशे वनप्रशिक्षनार्थी विदयार्थी प्रशिक्षण घेतात आजवर हजारो विद्यार्थ्यांनि येथून प्रशिक्षण घेतले असून त्याच बरोबर येथे जवळच हरीण पैदास केंद्र असून या हरीण पैदास केंद्रातील प्राण्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातून पर्यटक येतात परंतु या वाहून गेलेल्या पुरामुळे वनप्रशिक्षणार्थी विद्यार्थी व कर्मचारी व शालेय विदयार्थ्यांना,पर्यटकना येण्याजाण्यासाठी मोठीं अडचण निर्माण झाली असून
येथील कर्मचारी आरोग्यविषयक समस्या उद्धभवल्यास रात्रीबेरात्री गावात यावे लागते त्याच बरोबर जीवन आवश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता गावात जावे लागतात मात्र हा पूल वाहून गेल्याने येथील कर्मचारी व पर्यटकांना मोठया अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
__________________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888