पाल येथे हरीण पैदास केंद्र पहायला जाताना सुकी नदिपात्रात बुडून अंजुम चा भावास वाचवताना मृत्यू ..
मच्छीमारांच्या प्रयत्नांनी सहा ६ जणांना जिवदान !
विवरे प्रतिनिधी –
विवरे येथील अंजूम शे जावेद ( वय ११ वर्ष ) हि उर्दू स्कूलच्या इयत्ता ५वी ची विद्यार्थीनी तिचे आई व दोघ भावंडांसोबत पाल येथील मावसा अकबर शे छब्बीर , तसेच मावशी कडे दुपारी १२ वाजे दरम्यान गेलेली होती. अंजुम शे. जावेद ( वय ११ वर्ष ) हि विवरे बु॥ येथील उर्दू स्कूल ची इयत्ता ५वीची हुशार विदयार्थीनी होती. आई, आजी , वरणगावची मामी , भावंडां सोबत पालच्या बाजूला असलेल्या सुकी नदीपात्र ओलांडतांना मावस भावाचा पाय घसरल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न अंजूम शे जावेद या मुलीने केला . मावसभाऊ वाचविण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेली अंजूम मात्र नदीच्या प्रवाहात आल्याने तिचा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडल्याने शेख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.