रावेर गणराया विसर्जनाच्या दिवशी दिसले हिन्दू मुस्लिम एकात्मतेच दर्शन
रावेर शहर प्रतिनीधी : ईश्वर महाजन
आज १९ सप्टेंबर वार रविवार दुपारी रावेर शहरात अंनत चतुर्थी श्री विसर्जनचा दिवस रावेर येथे २१ मार्च अखंड भारतात जनता कफ्यू असतांना दोन ते चार तरुणाच्या वादाचे परिवर्तन एका काळ्या घटनेत परावर्तीत होवुन दोन समाजात झालेली कटुता – नंतर स्थानीक प्रशासनाने लावलेला कफ्यु दोन समाजाच्या तरुणांनी केलेले चुकीचे वर्तन यात रावेर शहरात मध्ये गालबोट लागुन एक निरअपराध वयस्कर व्यक्तीचा नाहक बळी गेला होता व लाखो रुपयाच्या मालमत्तेची हानी झाली होती त्यांनतर रावेर शहरांत आज एक एकात्मतेच दर्शन घडवित ज्या मज्जिद जवळ हे वाद झाला होता त्यांच प्रार्थना स्थळावरून आज राजे छत्रपती शिवाजी चौकातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या करण्यासाठी जाणाऱ्या श्री गणेशाच्या मुर्ती व कार्यकर्ते ॲड लक्ष्मण शिंदे, राजेश शिदे, पिन्टू दाणी , अनिल महाजन , श्याम शिंदे व गणेश भक्त यांच्या वर फुलाची उधळण मजिद वरून करण्यात आली त्या सर्व मण्यार समाज बांधवांनी प्रेम पुर्वेक फुलाचा वर्षाव केला त्याप्रसंगी तेथील विश्वस्त मौलाना रफीक भाई , हाजी गुलाम शेख कादर , शफी शेठ खलील शेख , मुस्ताक हुसेन शेख, शफीउद्दीन शे खान मोहम्मद, शफी शेठ त्या प्रसंगी मुक्ताईनगर डी . वाय एस . पी . फैजपुर प्रभारपदी असलेले विवेक लवाड साहेव ,रावेर पोलीस स्टेशन निरीक्षक कैलाश नांगरे, उपनिरीक्षक शितल कुमार नाईक यांनी सर्व हिन्दु मुस्लीम मान्यवरांचे फुल् देवुन दोघं समाजाच्या मान्यवराचे कौतुक केले व एक रावेर एक उत्तम असा गोडावा दिसत असल्याचे आज दिवसभर चर्चा रावेरकरात दिसत होती , गोपनिय विभागाचे विकास देशमुख , राजेंद्र करोडपती व विजय जावरे हे सोबत होत आज बघण्यात आले ह्या गोड अश्या गणपती मुर्ती वर होणारा मज्जिद वरून फुलांची पुष्पवृष्टी प्रत्येक रावेरकराच्या स्टेट्स वर झळकत असतांना दिसत होती हा गोड प्रसंग प्रत्येक रावेर शहरातील जन सामान्याना हवा आहे जणु त्यांची सुरवात दिसत होती