खिर्डी येथील महिला रुग्णावर उपचार करण्यास रावेर ग्रामीण रुग्णालयातील सिस्टर ची टाळाटाळ.!
रावेर – तालुका प्रतिनिधी ( प्रदीप महाराज )
भिमराव कोचुरे हे खाजगी कामानिमित्त रावेर येथे गेले होते. दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या पत्नीला थंडी वाजून ताप आला हि लक्षणे जाणवू लागल्याने ग्रामीण रुग्णालय जवळ असल्याने त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी गेलो असता तिथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या सिस्टर ने सांगितले ओपिडी फक्त बारा वाजेपर्यंत सुरू राहते ओपीडी बंद झाल्यानंतर येणाऱ्या
रुग्णावर उपचार करता येत नाही तुम्ही उद्या या असे म्हणत उपचार करण्यास नकार देण्यात आला.
आजाराची लक्षणे केव्हाi जाणवतील.याची शक्यता नाही किंवा ऐनवेळी कोण आजारी पडील याची शाश्वती नाही.ज्या वेळेस कुणाला काही त्रास होवू लागल्यास ती व्यक्ती आपल्या रुग्णालयात औषधीउपचार घेण्यास कोणत्याही क्षणी येवू शकते याची गॅरंटी नाही. १२वाजे नंतर उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णास उपचार करण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मनाई करण्यात आली आहे का? फक्त १२वाजे पर्यंत येणाऱ्या रुग्णावरच उपचार केले जातात याची काही नियमावली आहे का ? असेल तर ती प्रसिध्द करण्यात यावी ? याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून सिस्टर वर योग्य ती कारवाई करण्यात यावी.असे खीर्डी गावातील भिमराव कोचुरे यांनी आमच्या दैनिक महारास्ट्र सारथी तालुका प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888