केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे नारीशक्तीच्या दिपाली चौधरी यांनी केले अभिनंदन
रावेर तालुका प्रतिनिधी: ( प्रदीप महाराज )
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा खासदार डॉ.भारतीताई पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल खान्देश नारीशक्ती गृप फैजपूर वतीने अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले आहे.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ.भारतीताई पवार यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे.याअगोदर देखील गेल्या मंत्रीमंडळात धुळे येथील खा.डॉ.सुभाष भामरे यांनादेखील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री पदावर संधी मिळाली होती. डॉ.भारतीताईंना आपल्या मंत्रीमंडळात स्थान देऊन मोदीजींनी उत्तर महाराष्ट्राला तर सन्मान दिलाच आहे पण त्याचबरोबर भारतीताईंच्या रुपाने एकप्रकारे उत्तर महाराष्ट्रातील नारीशक्ती ला देखील आदराचं स्थान दिले आहे असं प्रतिपादन यावेळी नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले. मंत्री डॉ.भारतीताई पवार यांच्या नाशिक येथील निवासस्थानी ही सदिच्छा भेट घेतली असून यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्यासह नाशिक येथील नारीशक्ती गृप पदाधिकारी व मा.केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता चौधरी, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील इ.उपस्थीत होते.
———————————————————————————————————————————————————————————————————————————————
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888