ग्रामपंचायतीच्या वीज बिल संदर्भात रावेर सरपंच संघटना यांनी घेतली अभियंता यांची भेट

प्रतिनिधी ( प्रमोद कोंडे – mob-9922358586 )

रावेर तालुका सरपंच संघटनेने ग्रामपंचायतीच्या विज बिला बाबत उपकार्यकारी अभियंता अनिल पाटील (महावितरण) रावेर यांना आपल्या अडचणी सांगितल्या तेव्हा कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांनी सरपंच संघटनेला सांगितले की,31/03 2021 पर्यंतचे पाणी पुरवठा वीज बिल आणि पथदिवे वीज बिल आम्ही तुम्हास मागणी करतच नाही आहोत आम्ही फक्त शासन निर्णयानुसार एप्रिल 2021 ते जून 2021 पर्यंतचेच बिल मागणी करत आहोत आणि त्यातून पण तुम्ही महावितरण कडे माहे एप्रिल 2021 ते माहे जून 2021 पर्यंत जो काही भरणा केलेला असेल तो वजा करून तुम्हास फक्त उर्वरीतच रक्कम भरणा करायचा आहे.
आणि रावेर उपकार्यकारी अभियंता महावितरण अंतर्गत ज्या गावांमध्ये सबस्टेशन आहेत त्या सरपंच महोदयांनी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीचा कर मागणी अहवाल ताबडतोब उपकार्यकारी अभियंता, महावितरण रावेर यांचेकडे जमा करावा.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदचे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष गणेश महाजन, तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव महेंद्र पाटील, प्रशांत पाटील, विजय महाजन, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!