पाल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी बेड शिल्लक नसल्याने एकाच बेडवर दोन दोन रुग्ण आरोग्य विभाग लक्ष देईल का?
रावेर तालुका प्रतिनिधी ( प्रदीप महाराज mob-7887987888 )
रावेर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील पाल येथे आरोग्य विभा गाच्या दुर्लक्षामुळे डायरीया आणि टायफाईड रुग्णाची दिवसेंदिवस वाढ होत असून पाल ग्रामीण रुग्णालयात रुग्णसंख्य दिवसेंदिवस वाढत आहे आरोग्य विभाग मात्र याविषयी दुर्लक्ष करत असल्यामुळे रुग्णसंख्या एवढ्या प्रमाणावर आहे इथे बेड कमी पडल्याने एकाच बेडवर दोन दोन रुग्णाचा उपचार केला जात आहे याबाबत विचारणा केली असता रुग्ण वाढले आहे बेड शिल्लक नसल्याने एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार द्यावा लागत आहे आरोग्य विभागाला पत्र देऊन याबाबत कोणतीच उपाय योजना करण्या अली नाही एका दिवसात 150 ते 300 ओपीडी निघत असून 70 च्या वर स्लाईन सपंत आहे
एकीकडे कोरोनाची तिसरी लाटे शक्यता आणि याठिकाणी कोरोना बाबत कोणतेच गांभीर्य घेतले जात पिण्याच्या पाण्याची ची नियमित साफ सफाई नाही,पाण्यात जंतनासक पावडर ही टाकली जात नाही,गवत, ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून तेही साफसफाई नाही त्याच बरोबर पावसाळा पूर्वी गावातील गटारी साफ केली जात मात्र यावर्षी सर्वच गटातरी घाणीचे भरलेली असून याबाबत ग्राम प्रशासनाला गांभीर्य नाही
ग्रामसेवक मात्र लक्ष देईल का?
पाल येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपल्याने आता गावाची संपुर्ण जबाबदारी आता ग्रामविकास अधिकारी यांच्यावर आहे त्यांच्यावरही खिरोदा आणि पाल असे दोन ठिकाणी चार्ज लागल्याने फक्त मंगळावर या दिवशी ग्रामसेवक पाल येथें येतात बाकीचे दिवस रामभरोसे ग्रामपंचायत कारभार सुरू आहे.
वैद्यकीय अधिकारी ठरतो आहे पाल वाशिया साठी आरोग्यदूत
पाल हे गाव सातपुड्याच्या अति दुर्गम भागात असल्याने पाल रुग्णालयात कोणताही वाद्यकीय अधिकारी येथे येण्यास तयार होत नाही जर यालाही तर दोन महिनीच्या वर टिकत नाही मात्र या डायरिया आणि टायफाईड च्या साथीमधून गोरगरिबांना वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील मात्र आरोग्य सेवा हिच इस्वर सेवा मानून चोविस तास उपस्तिथी देऊन रुग्णांना स्वतः उपचार देत आहे. त्यामुळे गावातील सर्व च रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाही गर्दी करत आहे. कर्मचारी स्टॉप व बेड ची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
मागील आठवड्यात दिवसाला सत्तर रुग्ण डायरिया आणि टायफाईडचे दाखल होते आज पंच्यांशी रुग्ण दाखल झाले मात्र औषध साठा अपुरा पडत आहे . औषध वाढून मिळाली पाहिजे कारण हा परिसर अति दुर्गम भागात असल्याने रात्री ही रुग्ण उपचारा साठी येतात आणि अशा वेळेस औषध उपलब्ध नसल्यास रुग्णाची धावपळ होते वैद्यकित अधिकारी डॉ. सचिन पाटील
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
7887987888