मध्य प्रदेश येथील महादेवाच्या दर्शन करून येणाऱ्या गाडी झाडावर आदळली दोन भावीक जागीच ठार

रावेर शहर प्रतिनीधी : ( ईश्वर महाजन )

२३ ऑगस्ट . वार सोमवार श्रावण महीन्याचा दुसरा सोमवार असल्याने महाराष्ट्रातील बरेच भावीक दर्शनास शिरवेल येथील महादेव दर्शनास व धबधबा , निसर्ग रम्य टेकडयाचे सोदर्य बघण्यास बरेच भावीक श्रावण महीन्यात जात असतात. परंतु तेथे बिनधास्त मिळणारी मोहाची दारु व वळणदार रस्ते यामुळे अपघात प्रमाण वाढत आहे. सदरहून मागच्या आठवड्यात सुद्धा रावेर येथील दोन तरुण हे अश्या कारणामुळेच मोटार सायकल अपघातात मृत झाले.पोलीस माहीती नुसार काल जळगाव येथील मालवाहू वाहनाने दहा व्यक्ती दर्शनास गेले होते शिरवेल येथून रात्री परत येत असतानां वाहन क्र एम एच १९ सी .वाय . ५३१५ हया वाहनाने रात्री ११ वाजता झाडास धडक दिली. ह्या अपघातात प्रशात साहेबराव तांदूळकर वय ३६ व गोलु बंडू परदेशी वय २६ दोघ जागीच मृत पावले दोघ तरुण हे कांचन नगर येथील रहीवासी होते व आठ जण जखमी झाले त्यात अजय वाल्हे वय २२ , महेश सोनवणे वय २१, गजानन रमेश पाटील वय २४, परेश निंबा सोनवणे वय २४, चेतन मोरे वय २३, रविंद्र मोरे वय २२ , गणेश सोनवणे वय २३ व वाहन चालक विक्की अरुण चौधरी वय २५ सर्व जखमी झाले पोलीस यांना माहीती मिळताच घटनास्थळी रवाना झाले व जखमी यांना दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहे परंतु अश्या घटनांनी वाढ होत असताना दिसत आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!