यशवंत प्रतिष्ठान रावेर व महिला पर्यावरण सखी मंच रावेर संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
रावेर प्रतिनिधी:- दि.१९
प्रदीप महाराज
रावेर पासून जवळ असलेल्या मोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प.अध्यक्षा मा.ना.सौ रंजना प्रल्हाद पाटील होत्या. प्रमुख पाहुणे श्री.नाना शंकर पाटील प्रांत समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सौ नयना निलेश पाटील प्रधानाचार्या किलबिल अँकॅडमी रावेर पूर्व प्राथमिक शाळा व जळगाव जिल्हा अध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच जळगाव या होत्या. व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ पाटील उपसरपंच श्री जे आर पाटील,श्री अप्पा पाटील,रवींद्र पाटील,विनोद पाटील सर,पोलीस पाटील विकास केळकर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मोरगाव सब स्टेशन येथील कार्यकारी अभियंते श्री गौरव बाविस्कर सर,प्राथमिक आरोग्य केंद्र चे उपकेंद्र खिरवड येथील येथील सौ सुवार्ता ढालवाले,सौ मनीषा पाटील, कार्याध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच जळगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सौं नयना पाटील यांनी आपल्या विषय मांडणीत कोरोना काळातील ऑक्सिजनची कमतरता या विषयावर लक्ष केंद्रित करून वाढदिवस, रक्षाबंधन तसेच अन्य भेटी प्रसंगी भेट म्हणून रोपे देणे ही सवय लावली पाहिजे व हिंदू रीती रिवाजा प्रमाणे गणेश उत्सव दुर्गा उत्सव व अन्य उत्सवात जे हे पर्यावरण पूरक साजरे केले पाहिजे असे आवाहन केले आगामी काळातील गणेश उत्सव
निर्माल्य संकलन करून खतनिर्मिती करण्याचा आग्रह धरला. हा पर्यावरण पूरक गणेश उत्सव म्हणून साजरा करावा असे आव्हाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी आपल्या मनोगतात मोरगाव गावात सुरू असलेले विविध पर्यावरण पूरक कार्यक्रम व अभियान खूप छान सुरू आहेत आणि भविष्यातही माझ्या परीने मी यथाशक्ती आपणास या विषयात सक्रिय मदत करेल असे सांगितले तसेच
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाना पाटील यांनी विविध गोष्टी रुपी उदाहरण सांगून उपस्थित महिलांना व पुरुषांना लहान मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही पर्यावरण संवर्धन कसे करता येईल हे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी महिला बचत गटाच्या सुनीता ताई महाजन,ललिता पाटील, सरलाताई नरेंद्र पाटील, साधनाताई भिका पाटील, चंद्रकला संजय पाटील,कामिनी पाटील, कार्तिकी महाजन,कुसुम बाई पाटील व गावकरी यांनी योगदान दिले. यशवंत प्रतिष्ठान रावेर तर्फे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मोरगाव सबस्टेशन येथील कार्यकारी अभियंता श्री गौरव बाविस्कर सर यांना पर्यावरण विषयातील वसुंधरेचे पुत्र हा पुरस्कार देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आले. मा श्री गौरव बाविस्कर अभियंता साहेब व त्यांच्या टिम ने कार्यालय परिसरात तीनशे हून अधिक रोपे लावून त्यांची संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. त्या साठी स्वतंत्र्य पाण्याची व्यवस्था पाईप लाईन द्यारे करण्यात आली आहे गावातूनच नव्हे तर पंचक्रोशीत ही त्यांचे या कामाबद्दल फार कौतुक होत आहे, असे आदर्श अधिकारी सर्व अन्य ठिकाणी लाभो व त्यांच्याकडून अधिकाधिक पर्यावरण विषयाचे कार्य होत राहो अशी जनमाणसात सुर आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन वसुधा पर्यावरण सखी मंच च्या रावेर शहर अध्यक्षा सौ जयश्री रमेश पाटील यांनी केले.